नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) भलेही म्हणत आहे की, जगाने कोरोना व्हायरसबरोबर काही काळ जगणे शिकले पाहिजे, परंतु त्याची लस बनवणाऱ्या टीम्सकडूनही चांगल्या बातम्या येत आहेत. जगभरात सुमारे २५ लस मानवी चाचण्यात आहेत, त्यापैकी दोन भारतातील आहेत. जगभरात अशा चार लस आहेत, ज्या शर्यतीत आघाडीवर आहेत आणि माकडांवर त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या लसींचा प्रयोग माणसांच्या मर्यादित संख्येवर देखील केला गेला आहे, आता त्यांची तपासणी मोठ्या समूहावर आणि गंभीर रूग्णांवर करण्यात येत आहे.
१. अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ तयार करत असलेली कोरोना लस (Oxford/AstraZeneca’COVID19 vaccine) AZD1222 च्या चाचणीचे प्रोत्साहनदायक परिणाम येत आहेत. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी चालू आहे. तसेच कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. लवकरच त्याचा डेटा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी पास्कल सॉरिट्स म्हणाले की, लसीचा विकास चांगला चालला आहे. आम्हाला लस परीक्षणा संदर्भात आतापर्यंतचा सर्वात चांगला डेटा मिळत आहे. ज्या व्हॉलिंटियर्सला ही देण्यात आली होती, त्यांच्या शरीरात विषाणूविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीसह व्हाईट ब्लड सेल्सच्या किलर सेल्स, टी-सेल्सही आढळल्या आहेत. दुसरीकडे ब्रिटनमध्येच जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीनेही समान परिणाम दिले आहेत.
२. नेदरलँडनेही लस चाचणीत मोठे यश मिळवले आहे. लसीच्या एका डोसमुळे माकडांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यास मदत झाली. लसीकरणानंतर जवळजवळ सर्व माकडांमध्ये अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार झाल्या. जेव्हा माकडांना विषाणूची लागण झाली तेव्हा सर्व माकडांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला नाही. सहापैकी पाच माकडांच्या नाकातही विषाणू आढळला नाही.
३. कोरोना विषाणूची लस विकसित करण्यासाठी जगभरात सध्या जवळपास १८० पर्याय प्रगतीपथावर आहेत आणि वेगवेगळ्या संशोधनात सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मानवावरील पहिल्या चाचणीमध्ये अमेरिकेची मॉडर्ना इंक लस mrna1273 देखील यशस्वी ठरली आहे. मॉडर्नाच्या लसीचे माकडांवरील चाचणी निकालही उत्कृष्ट होते. म्हणजे आतापर्यंत अशा चार लसी आहेत ज्या माकडांमध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यात यशस्वी झाल्या आहेत.
४. रशिया आणि चीनची लस जगभरात आघाडीवर आहे. या दोन्हीही मानवांवर चाचणीच्या प्रगत टप्प्यात आहेत. रशियाने १० ऑगस्टपर्यंत जगातील पहिल्या कोरोना विषाणूची लस मंजूर करण्याची योजना तयार केली आहे. लस मंजूर झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर संस्था ही लस बाजारात आणू शकते. सूत्रांनी सांगितले की, ‘नोंदणीची कागदपत्रे १० ते १२ ऑगस्टपर्यंत तयार झाली पाहिजेत. यानंतर १५ ते १६ ऑगस्टपर्यंत ती बाजारात येण्याची शक्यता आहे.’ एका वृत्तसंस्थेनुसार, १० ऑगस्टपर्यंत रशियाची लस मंजूर करण्याची योजना आहे, जी मॉस्कोमधील गामालेया महामारी संस्थेने तयार केली आहे.
दुसरीकडे चीनने मे महिन्यातच वर्षाच्या अखेरीस लस विकसित करण्याचा दावा केला होता. चीनच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते की, चीनमध्ये तयार झालेली कोरोना विषाणूची लस या वर्षाच्या अखेरीस वितरणासाठी बाजारात येऊ शकते. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स यांनी तयार केलेल्या लसीची २००० लोकांवर चाचणी केल्याचा दावा केला गेला होता.