नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही कोविड व्हॅक्सीन ( Covid-19 Vaccine ) घेतली आहे किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. अनेकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर हलका ताप किंवा दुसरी समस्या होऊ शकते. अशावेळी घाबरण्याचे कारण नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच भरपूर आराम केला पाहिजे.
1 ताबडतोब कामावर जाऊ नका –
Covid-19 Vaccin – व्हॅक्सीन घेतल्यावर 1-2 दिवस आराम करा. ताबडतोब कामावर जाऊ नका. व्हॅक्सीनच्या 24 तासानंतर सुद्धा साईड इफेक्ट दिसू शकतात.
2 प्रवास टाळा –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर 2-3 दिवस प्रवास टाळा. अमेरिकन सीडीसीच्या गाईडलाईनमध्ये व्हॅक्सीन घेतल्यानंतर प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
3 गर्दीत जाणे टाळा –
Covid-19 Vaccin व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला असेल तर गर्दीत जाणे टाळा. सुरक्षेची काळजी घ्या. 3 दिवसापर्यंत दारू आणि सिगारेट पिऊ नका. बाहेरचे खाणे टाळा.
4 हायड्रेटेड रहा –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर हायड्रेट रहा. फळे, भाज्या, सुकामेवा खा. भरपूर पाणी प्या.
5 विना मास्क बाहेर पडू नका –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर अनेक दिवसांनी शरीरात अँटीबॉडी बनते, या दरम्यान मास्क घातला नाही तर तुम्हालाही कोरोना होऊ शकतो. सर्वप्रकारची काळजी घ्या.
6 वर्कआऊट करू नका –
जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर 2-3 दिवस करू नका. व्हॅक्सीननंतर अनेक लोकांना हाताला वेदना होतात आणि अशावेळी वर्कआऊट केल्यास वेदना आणखी वाढू शकतात, म्हणून वर्कआऊट टाळा.
7 डॉक्टरांशी संपर्कात रहा –
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर व्हॅक्सीन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची समस्या होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कृपया हे देखील वाचा:
उष्ण हवामानात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा
देहुरोडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार