नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट पुन्हा एकदा भारतात वेगाने वाढत आहे. रोज 50 हजारपेक्षा जास्त नवीन केस समोर येत आहेत. जगाबद्दल बोलायचे तर आतापर्यंत 12 कोटी 55 लाखांपेक्षा जास्त लोक या व्हायरसने संक्रमित झाले आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे हे उपाय यावर सतत करत राहिले पाहिजेत. शिवाय काही घरगुती उपाय अलंबून सुद्धा कोरोनाला रोखू शकता, हे उपाय पुढील प्रमाणे…
1. गरम पाण्याने गुळणी –
गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून दिवसातून दोन वेळा गुळण्या करा. यामुळे श्वसनप्रणाली (रेस्पिरेटरी सिस्टम) कोराना मुक्त राहिल.
2. हळदीचे दूध –
रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. हे व्हायरसपासून बचाव करेल, इम्यूनिटी वाढवेल.
3. तुळशीचा काढा –
तुळस, लवंग, पिपळी आणि दालचीनी पाण्यात उकळवून काढा तयार करा आणि दिवसात दोन वेळा प्या. इम्यूनिटी मजबूत होते, व्हायरस नष्ट होतात.
4. या मसाल्यांचा करा वापर –
हळद, ओवा, पिपळी, काळीमिरी, दालचीनी, सैंधव मीठ – हे काही असे मसाले आहेत जे कोरोना व्हायरसला मारण्यास मदत करतात. याचा काढा किंवा चहा बनवू शकता.
5. या गोष्टी लक्षात ठेवा –
रोज किंमान 20 मिनिटांसाठी सकाळच्या उन्हात बसा, किमान 8 तास झोप घ्या, रोज दिड ते दोन लीटर पाणी प्या. थंड काहीही खाऊ नका.