बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच निरोगी झाल्यानंतरही कोरोनाचा धोका कायम राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनो तुम्ही कोरोनानंतर निरोगी झाल्यावर काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर कोरोनाचा धोेका तुम्हाला कायम असणार आहे.
दक्षिण कोरियात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही रुग्णांना पुन्हा कोरोना झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशी एकूण 91 प्रकरणे एकाच दिवशी उघडकीस आली आहेत. हे कसे घडत आहे हे अद्याप डॉक्टरांनाही समजू शकलेले नाही. दक्षिण कोरियातील आतापर्यंत या देशातील सुमारे 7 हजार लोक कोरोनामुळे बरे झाले आहेत. दक्षिण कोरियातील प्रमुख डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या 91 लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, कदाचित असे झाले असेल की रुग्णाला संसर्ग झालेला नसेल परंतु त्याच्या शरीरात आधीच अस्तित्वात असलेला व्हायरस पुन्हा सक्रिय झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
इतकेच नाही काही डॉक्टरांनी चाचणी किटमध्ये एखादी समस्या उद्भवली असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 211 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे कोरोनाची 10 हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण कोरियाच्या सरकारने संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित सर्व चर्च बंद करुन देशाातील सर्व निषेध व बौद्ध कार्यक्रम रद्द करण्यात आले.