नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा वेग जरी कमी झाला असला तरी ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संपूर्ण जगाला संकटात टाकले आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जर कोरोनासाठी जारी करण्यात आलेल्या गाईडलाइनचे पालन योग्य प्रकारे केले गेले तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचता येऊ शकते. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात कारोना व्हायरस संसर्गाची 18,177 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 217 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित रूग्णांची एकुण संख्या 1 कोटी 3 लाख 23 हजार 965 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 99 लाख 27 हजार 310 लोक रिकव्हर झाले आहेत, तर यावेळी 2 लाख 47 हजार 220 अॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांचा एकुण आकडा वाढून आता 1 लाख 49 हजार 435 झाला आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 9,58,125 कोरोना तपासण्या करण्यात आल्या.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 3,218 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या वाढून 19,38,854 झाली. आरोग्य विभागानुसार, मागील 24 तासात या महामारीमुळे आणखी 51 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात मृतांची संख्या वाढून 49,631 झाली आहे. आणखी 2,110 लोकांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यात बरे झालेल्या लोकांची एकुण संख्या 18,34,935 झाली आहे. राज्यात सध्या 53,137 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर मुंबईत संसर्गाची 593 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 2,94,660 झाली आहे. तर संसर्गामुळे आणखी 7 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 11,132 झाली आहे.