वॉशिंंग्टन : वृत्तसंस्था – भारत बायोटेकने बनवलेली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) कोव्हॅक्सीनचा (Covaxin) परिणाम आता अमेरिकेने सुद्धा मान्य केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) (एनआयएच) ला आढळले आहे की, कोव्हॅकसीनमुळे शरीरात तयार झालेली अँटीबॉडीज कोरोना व्हायरसच्या (coronavirus) अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंट्सशी लढण्यासाठी उपयोगी आहे. कोव्हॅक्सीन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून भारत बायोटेकने बनवली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
एनआयएचने सांगितले की, कोव्हॅक्सीन घेणार्या लोकांच्या ब्लड सीरमच्या अभ्यासातून हे समजले आहे की, लसीमुळे जी अँटीबॉडीज बनते, ती ब्रिटन आणि भारतात (Britain, India) सर्वात अगोदर सापडलेल्या कोरोनाच्या बी.1.1.7 (अल्फा) आणि बी.1.617 (डेल्टा) व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे.
यापूर्वी अमेरिकेचे इन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉक्टर अँथनी फाउची यांनी सुद्धा अनेकवेळा कोव्हॅक्सीनचे कौतूक केले आहे. फाउची यांनी म्हटले होते की, भारतात तयार केलेली कोव्हॅक्सीन कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स नष्ट करण्यात सक्षम आहे.
Pune Ambil Odha Slum । ‘माझा काय संबंध ? बदनाम का करतात ? – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोव्हॅक्सीन डेड कोरोना व्हायरसपासून बनवली आहे जी शरीरात या व्हायरसशी लढण्यासाठी योग्य अँटीबॉडीची निर्मिती करते. कोव्हॅक्सीनच्या दुसर्या टप्प्यातील ट्रायलच्या डेटानुसार, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ही व्हॅक्सीन सिम्पटोमॅटिक प्रकरणात 78, तर असिम्पटोमॅटिक प्रकरणात 70 टक्के परिणामकारक आहे. कोरोनाच्या गंभीर प्रकरणात सुद्धा व्हॅक्सीन चांगली ठरत आहे.
Web Title :- covaxin effectively neutralises both alpha delta variants of covid 19 founds us top health institute
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत