रांची : वृत्तसंस्था – एक गवातील प्रेमी युगलाला गवातील लोकांनी नको त्या अवस्थेत पकडलं. यानंतर गावात पंचायत बसली. पंचायतीच्या तुलगलकी फर्मानानंतर पुरुषाचं अर्ध मुंडन करण्यात आलं. यानंतर दोघांना अर्धनग्न करत चपलेचा हार घालून गावातून फिरवण्यात आलं तेही वाजत गाजत.
झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील तालझारी क्षेत्रातील महाराजपूर कल्याणी मधील एका व्यक्तीला आदिवासी महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवताना नको त्या अवस्थेत पकडण्यात आलं. या कपलला शिक्षा देण्यासाठी नंतर पंचायत बसली.
पंचायतीच्या तुगलकी फर्मानानंतर पुरुषाला अर्धनग्न करत त्याचं अर्ध मुंडन करण्यात आलं. चपला बूटांचा हार घालत त्यांना गावातून फिरवण्यात आलं. पुरुषाला टी शर्ट आणि अंडरवियरवरच गावातून फिरवण्यात आलं. महिलाही अर्धनग्न अवस्थेतच होती. वाजत गाजत या कपलची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर पोलिसांना याची सूचना मिळाली तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ठाण्यात घेऊन गेले.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक म्हणाले, “पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, बुधवारी सकाळी महाराजूपरच्या मीना बाजारात एका महिला आणि पुरुषाला अर्धनग्न करत खुलेआम चप्पल बुटांचा हार घालत गावातून फिरवलं जात आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून याचा अधिक तपास केला जात आहे. जर पीडित व्यक्तीने अर्ज दिला तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल.”
Visit : bahujannama.com