नवी दिल्ली : जगातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी सकाळी जगातील कोरोना बाधितांची संख्या १० लाख १५ हजारांपर्यंत पोहचली आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखांपर्यंत गेली आहे.
जगातील सर्वात मोठी महासत्ता कोरोना विषाणू समोर असहाय्य झाली आहे. गुरुवारी दिवसभरात अमेरिकेत तब्बल १ हजार १६९ जणांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ६ हजार ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १ लाख १५ हजार २४२ जण कोरोना बाधितांची संख्या असून १३ हजार ९१५ जणांचा मृत्यु झाला आहे. स्पेनमध्येही १ लाख १२ हजार ६५ जण कोरोना बाधित आहेत. त्यापैकी १० हजार ३४८ जणांचा बळी गेला आहे. जर्मनीमध्ये ८४ हजार ७९४ बाधित असून तेथे १ हजार १०७ जणांचा मृत्यु झाला आहे.
इग्लंडमध्ये ३३ हजार ७१८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी २ हजार ९२१ जणांचा मृत्यु झाला आहे. नेदरलँडमध्ये १४ हजार ६९७ जणांना बाधा झाली आहे. तेथे १ हजार ३३९ जणांचा मृत्यु झाला आहे. युरोपातील देशांमधील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच चीनच्या जवळ असलेल्या दक्षिण कोरियाला मृत्यु संख्या कमी ठेवण्यात यश आले आहे. दक्षिण कोरियामध्ये १० हजार ६२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील १७४ जणांचा मृत्यु झाला आहे. अन्य देशांच्या मानाने ही संख्या खूप कमी आहे. जास्तीत जास्त लोकांच्या झटपट तपासणी करण्यात आल्याने बाधित लोकांना तातडीने क्वारंटाईन करणे आणि त्यांच्यावर उपचार करण्यात यश आल्याने कोरोना बाधितांची संख्या व मृत्युची संख्या मर्यादित ठेवण्यात दक्षिण कोरियाला यश आले आहे.