नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cotton Global Market Prices | कापसाची शेती यावर्षी भारतीय शेतकर्यांसाठी फायदेशी ठरत आहे. आता कापूस उत्पादकांसाठी (Cotton Producers) जागतिक बाजारातून चांगली बातमी आहे. जागतिक बाजारात कापसाचे दर (Cotton Global Market Prices) 7 वर्षाच्या उच्चस्तरावर पोहचले आहेत. यामुळे भारतीय कापसाचे दर जुलै 2021 मध्ये नोंदल्या गेलेल्या उच्चस्तराजवळ पोहचले आहेत.
जुलैमध्ये दर 10 टक्के वाढला
या आठवड्यात कापसाच्या किमतीत 3 टक्केची उसळी नोंदली गेली. तर, जुलै 2021 मध्ये याचा दर 10 टक्के वाढला होता.
जागतिक किमतीत 97 सेंट प्रति कापूस गाठ (Cotton Bales) ची तेजी आली आहे.
ही तेजी तेव्हा आली आहे, जेव्हा ग्लोबल मार्केटमध्ये कॉटनच्या पुरवठ्यात कमजोरी आली आहे.
भारतात निर्यातीमध्ये 54% वाढ
कापड उद्योगात (Textile Industry) कापसाच्या मागणीत मागील काही काळापासून वाढ नोंदवली गेली आहे.
2021-22 साठी ग्लोबल कॉटनचा स्टॉक सुमारे 8.93 कोटी गाठ राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा मागील 3 वर्षातील सर्वात कमी आहे, तर जागतिक उत्पादन 5 टक्के वाढून 11.8 कोटी गाठ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निर्यातीमध्ये 54 टक्केवाढ
हे अजूनही कोरोना महामारीच्या अगोदरच्या उत्पादनापेक्षा खुप कमी आहे.
भारतीय बाजारात पिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
तर, निर्यातीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 54 टक्केची वाढ झाली आहे.
या सर्व कारणामुळे कापसाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एमएसपीमध्ये 15 टक्के वाढ
जागतिक बाजारात मार्च 2021 च्या दरम्यान कापसाच्या दरात आलेल्या तेजीनंतर देशात कापसाचा भाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) 15 टक्के वाढली.
सरकारने कापसाची एमएसपी 5,825 रुपये प्रति क्विंटल आणि मध्यम लांबीच्या रेशा कापसाची एमएसपी 5,515 रुपये प्रति क्विंटल ठरवली होती.
कापसाचे पेरणी क्षेत्र वाढणार
त्यावेळी गुजरातमध्ये कापसाचा भाव 6,500 रुपये प्रति क्विंटल होता.
कापसाच्या किमती आता 7 वर्षाच्या उच्च स्तरावर पोहचल्य आहेत.
यामुळे पुढील सीझनमध्ये कापसाच्या शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढेल.
सोबतच कापसाच्या प्रेरणी क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ होईल.
Web Title : Cotton Global Market Prices | good news for farmers cotton prices at 7 years high in global market know why.