सांगली बहुजननामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. परंतु या डॉक्टरने केवळ ३० रुपयांची लाच घेताना त्याला पकडण्यात आले आहे. याप्रकऱणी या आरोग्य अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नितीन बापू चिवडे (वय ४६) असे अटक रंगेहात पकडलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. नितीन चिवडे हे कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार असतानाही चिवडे यांनी ऐतवडे खुर्द येथील रुग्णाकडे पैशांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित रुग्णाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सापळा रचून अँटी करप्शनच्या पथकाने त्यांना ३० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.