यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol), उपमहापौर सुनिता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) उपस्थित होते. भविष्यात या विषयात सर्वतोपरी कायदेशीर प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) कटिबद्ध असल्याचे नगरसेवक धीरज घाटे (Corporator Dhiraj Ghate) यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवेदनात म्हटले की, 2013-14 च्या ऑडीट रिपोर्टनुसार पुणे मनपातील सेवकांच्या घर भाड्यात तडकाफडकी वाढ करण्यात आली व आता सातव्या वेतन आयोगामुळे प्रचंड प्रमाणात घरभाडे वाढ (House Rent Increase) झालीआहे. ही बाब अन्यायकारक आहे. पुणे मनपा वसाहतींचे बांधकाम होऊन 40 ते 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. येथील खूप इमारती ह्या मोडकळीस आलेल्या आहेत. वसाहतीमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. काही इमारती ह्या धोकादायक आहेत. मागील वर्षी पुणे मनपातील चाळ विभागाकडील अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करुन या इमारती धोकादायक जीर्ण झालेल्या, मोडकीस झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असा अहवाल सादर केला आहे.
तरी या सेवकांचा सहानुभूतीने विचार करुन आयुक्तांनी प्रत्यक्षात इमारतींची पाहणी करुन घरांची स्थिती पाहावी व त्या प्रमाणात घरभाडे आकारले जावे, अशी मागणी नगरसेवक धीरज घाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
Web Title :- Corporator Dhiraj Ghate | Increase in rent of employees living in slums, should be reconsidered by the municipality; Corporator Dheeraj Ghat’s statement to the Commissioner
Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !