बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी बाळाला जन्म दिला. जॉन्सन त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करणार्या डॉक्टरांच्या नावावरुन बाळाचे नाव ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली.
विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असे बाळाचे नाव असून निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असे जॉन्सन यांच्यावर उपचार केले. हे दोन्ही डॉक्टर संसर्गजन्य रोग आणि व्हेंटिलेटर्स स्पेशॅलिस्ट आहेत. बाळाच्या नावाबद्दल सायमंड्स यांनी त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये बोरिसचे प्राण वाचवले, असे नावाचे स्पष्टीकरण सायमंड्स यांनी पोस्ट केले आहे. ट्विटवरुनही त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 27 एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोरोना विरोधी दलाची सूत्रे हाती घेणार्या जॉन्सन यांनाही 12 एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी माझे प्राण वाचवणार्या डॉक्टरांचे आभार मानतो असे म्हटले होते.
एनपी न्यूज24 नेटवर्क