बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार आहेत. रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून संदेश देण्याची, तसेच एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत.
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा करणार आहेत. मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन माहिती दिली आहे.पंतप्रधान कार्यालय पीएमओने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.
’पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.’ आणखी एक ट्वीट करत पीएमओ कार्यालयाने ’पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत समिक्षा करण्यासाठी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये ’कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला आणखी मजबुत करण्याच्या पद्धतींवर चर्चा करणार.’ असल्याचे नमूद केले आहे.