पिंपरी / पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1269 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 हजार 493 इतकी झाली आहे.
महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1269 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 हजार 493 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 1259 शहरातील तर 10 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत. शहराबाहेरील 932 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 24 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1171 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 943 तर शहराबाहेरील 228 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 24 रुग्णांमध्ये 17 रुग्ण हे मनपा हद्दीतील आहेत तर 7 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.
शहरामध्ये सध्या 5 हजार 993 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 269 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज शहरात 676 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 47 हजार 077 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात गेल्या 24 तासात भोसरी, संभाजीनगर, निगडी, दिघी, पिंपळे निलख, आकुर्डी, थेरगाव, संततुकाराम नगर, शाहूनगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, सांगवी, इंद्रायणीनगर, चिंचवड, चिंबळी, देहूगांव, मावळ, देहूरोड, शिरूर, पुणे, खेड येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.