नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसबाबत जग चिंतेत असून प्रत्येक देश शक्य ते उपचार शोधत आहेत. यादरम्यान आजार वेगाने वाढत असून या आजारापासून पाकिस्तानही वंचित राहिलेला नाही. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचे पाच नवीन प्रकरणे समोर आली असून त्यानंतर तिकडे कोविड-१९ ने संक्रमण झालेल्या लोकांची संख्या वाढून ३३ झाली आहे. तर काही लोकं संशयित असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. यादरम्यान पाकिस्तानकडून एक विचित्र प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक पहिलवान माणूस दुकानात आहे. जो दुकानामध्ये असलेल्या Fire Extinguisher जवळ जातो. तो त्याला हॅन्ड सॅनिटायझर समजून वापरायचे आहे. तेव्हा त्यातून अचानक धूर निघायला लागतो. Fire Extinguisher बर्याचदा आग विझविण्यासाठी वापरली जाते, परंतु हात स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो असे त्याला वाटले.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानच्या गुजरावालचा असल्याचे सांगितले जात असून संशयिताच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघून या संशयितासारखे कृत्य करू नका. नाहीतर तुमचेही हात जळू शकतात. किंवा जखमही होऊ शकते, जे तुमच्यासाठी समस्या होऊ शकते.