मुंबई: बहुजननामा ऑनलाईन – कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकांमध्ये आहे हे तपासण्यासाठी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) संपूर्ण देशात सर्वेक्षण केले. त्यामध्ये ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचे समोर आले. परंतु हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे काही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
देशभरात ४० हुन अधिक सीएसआयआरची केंद्रे आहेत. त्यामध्ये केंद्रांमध्ये १० हजार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुबांतील सदस्यांना तपशील घेण्यात आला. सीएसआयआरचे १४० शास्त्रज्ञ आणि चिकित्सक सर्वेक्षण प्रक्रियेचा भाग होते. सर्वेक्षणानुसार, ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो, तर बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना काेराेनाचा जास्त धोका असतो. मात्र, काही वैद्यकीय तज्ञांनी हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. असे म्हंटले आहे.
या निरीक्षणसंदर्भात बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, हे केवळ निरीक्षण आहे. १० हजार ७१४ नागरिकांचे सर्वेक्षण करून हे निरीक्षण नाेंदविले. परंतु, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, स्वच्छता, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे.
काळजी घेणे, सुरक्षित राहणे गरजेचे!
डॉ रंजीत केणी यांनी काेराेनाप्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे असा सल्ला दिला आहे. अनेक संस्थांमध्ये असे अशा स्वरूपाचे सर्वेक्षण, अहवाल समोर येत असतात. मात्र हे सर्व निरीक्षणांचा भाग आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी यावर अवलंबून न राहता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ केणी यांनी सांगितले.