वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगातील अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला तर कोट्यावधी लोक संक्रमित झाले. कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कोरोना हा विषाणू नेमका आला कुठून आणि तो जगभरात पसरला कसा, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. परंतु हा विषाणू चीनच्या वुहान प्रांतात पहिल्यांदा आढळून आला होता. वुहानमधील एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचा संशय यापूर्वी अनेकांनी व्यक्त केला होता. यावर शिक्कामोर्तब करणारे एक वृत्त प्रसिद्ध झालं आहे.
अमेरिकेच्या एका गोपनीय अहवालानुसार, जगात कोरोनाचा फैलाव होण्याच्या एक महिना आगोदर वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले होते. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नरलनं यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीचे तीन संशोधक नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडले होते. त्यांना उपचारासांसाठी रुग्णालयाची गरज होती. असं या वृत्ता म्हटले आहे. या वृत्तात वुहानच्या लॅबमधील आजारी संशोधकांची संख्या, ते कधी आजारी पडले आणि त्यांना उपचारासाठी कधी रुग्णालयात हलवण्यात आले, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Three Wuhan Institute of Virology researchers became sick enough in November 2019 that they sought hospital care, according to a U.S. intelligence report that could add to calls for a fuller probe of whether the Covid-19 virus may have escaped from the lab https://t.co/kzvVbFQZDf
— The Wall Street Journal (@WSJ) May 23, 2021
वुहानमध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. वुहानमधील लॅबमधून जाणूनबुजून कोरोनाचा विषाणू सोडण्यात आला असा संशय अनेकांना आहे. त्यातच आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तामुळे संशय अधिकच बळावला आहे. कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला याबद्दलची पुढील चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक होण्याच्या एक दिवस आधीच हे वृत्त प्रसिद्ध झालं आहे. अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु बायडन प्रशासन कोरोनाच्या उगमाच्या तपासाबद्दल अतिशय गंभीर असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक वुहान येथे गेले होते. कोरोना विषाणू वुहानमधून कसा पसरला याचा शोध घेण्याची जबाबदारी या पथकावर होती. कोरोना विषाणू वुहानच्या लॅबमधून जगभरात पसरला याचे पुरावे मिळाले नसल्याचा खुलासा या पथकाने केला होता. परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख चिनी विषाणू, वुहान विषाणू असा वारंवार केला होता. यावर चीननं आक्षेप घेतला होता.