• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘प्रविण दरेकरांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीसांना तरी समजला का ?’

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
devendra fadanvis, chandrakant patil

मुंबई: बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत राज्यात काही निर्बंध लागू केले आहेत त्याचबरोबर लॉकडाऊनचाही इशारा दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. यावरून शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनातून दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन राज्यात आढळून आला आहे. तो वेगाने पसरत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती. ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ असे दरेकर यांनी म्हंटले होते. त्याला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिल आहे.

कोरोनाची दुसरी लाट राज्यात धडक मारते आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. मुंबईत हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागरिकांचा हलगर्जीपणाही वाढला. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समोर येऊन सगळ्यानांच कडू औषधाचा डोस पाजावा लागला.सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणण्याबरोबरच काही निर्बंध लागू करण्यात आले. लोकांनी शिस्त नाही पाळली तर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लॉक डाऊनचा इशारा दिला होता. अशा संकट प्रसंगी कोणीही राजकरण न करता सरकार आणि विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे. एकोप्याने काम करणे गरजेचे आहे. मात्र मुख्यमंत्र्यानी लॉक डाऊनचा इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका. दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात….
‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोरोना संसर्गाची सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे? यापूर्वी करोनाच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात कुचकामी आहे, हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे.

देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत. पण मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे,” असे शिवसेनेनं म्हंटल आहे.

मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही.

राज्यातील विरोधी पक्ष हा याच मातीतला आहे तो काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल,” असा सल्लाही शिवसेनेनं भाजपा नेत्यांना शेवटी दिला आहे.

Tags: AIIMSAntibodiesAshish ShelarBJPChandrakant PatilChief Minister Uddhav ThackerayconferenceDevendra FadnavisDirector Dr. Randeep GuleriagovernmentHeard immunityIn the front page of the matchLegislationMinister of HealthModimumbaiParty leaderPravin DarekarPresident'sPrime MinisterShiv Senaअँटीबॉडीजआरोग्यमंत्रीआशिष शेलारएम्सदेवेंद्र फडणवीसपंतप्रधानपक्षनेतेपरिषदेतप्रविण दरेकरभाजपमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमोदीराष्ट्रपतींविधानशिवसेनेसंचालक डॉ. रणदीप गुलेरियासरकारसामनाच्या अग्रलेखातहर्ड इम्युनिटी
Previous Post

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

Next Post

कारमध्ये मालक करत होता महिलेवर बलात्कार, ड्रायव्हर चालवत राहिला गाडी

Next Post
rape car

कारमध्ये मालक करत होता महिलेवर बलात्कार, ड्रायव्हर चालवत राहिला गाडी

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

6 days ago

करदात्यांना दिलासा ! ‘विवाद से विश्वास’ योजनेची ‘अशी’ होणार मदत, जाणून घ्या

3 days ago

शिवसेनेचा BJP ला थेट इशारा, म्हणाले – ‘पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत’

7 days ago

नोकरी करणार्‍या महिलांसाठी खुशखबर ! ESIC ने आजारपणातील लाभाशी संबंधीत नियमात केला बदल, जाणून घ्या

7 days ago

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शेअर केले फोटो

10 hours ago

मोटेरो नाही तर आता नरेंद्र मोदी स्टेडियम ! आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे स्टेडियम बनले जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat