देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला, 1000 पटींनी जास्त धोकादायक; हैदराबादच्या वैज्ञानिकांचे संशोधन

हैदराबाद : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात पहिल्या लाटेचा एवढा प्रभाव जाणवला नसताना अचानक दुसरी एवढी मोठी लाट कशी आली, याचे उत्तर हैदराबादच्या संशोधकांनी लावला आहे. त्यांनी कोरोनाच्या जीवघेणा व्हायरस म्यूटेंटचा शोध लावला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस अन्य स्ट्रेनच्या तुलनेत 1000 पटींनी अधिक संक्रमण करणारा आहे. या म्युटेंटमुळेच देशातील काही भागात कोरोनाने हाहाकार माजवल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दरम्यान देशात दररोज जवळपास 4 लाख नवे कोरोना रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अशा स्थितीत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.
सध्या देशात जो व्हायरल पसरला आहे, तो इतर स्ट्रेनपेक्षा 10 ते 1000 पटींनी अधिक धोकादायक आहे. या म्युटेंटला N440K नाव दिले आहे. या स्ट्रेनमुळेच देशात कोरोनाने थैमान घातले आहे. आंध्रप्रदेशच्या करनूल शहरात पहिल्यांदा हा नवा व्हायरस सापडला. आता हा म्य़ुटेंट आंध, तेलंगणासह अन्य राज्यांत पसरला आहे. कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे याच व्हेरिअंटमुळे येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे गेल्या दोन महिन्यांत देशातील 50 टक्के कोरोना रुग्ण हे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये सापडले आहेत. या चार राज्यांत कोरोनाचा हा नवा स्ट्रेन पसरल्याचे संकेत देत आहे. हे संशोधन हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि गाझियाबादची अॅकॅडमी फॉम साइंटिफिक अँड इनोव्हेशन सेंटरच्या वैज्ञानिकांनी केले आहे.
Comments are closed.