पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोना व्हायरस बराच वेळ टिकून राहणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. अनेक देश अद्यापही कोरोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या स्टेजवर असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी जे देश कोरानावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली असल्याचे दिसून आले आहे.
असे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने 30 जानेवारी रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. यामुळे अनेक देशांना तयारी करण्यासाठी आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी योजना तयार करण्यासाठी वेळ मिळाला आहे. कोरोनासंबंधी परिस्थिती योग्य हाताळली नसल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे. पश्चिम युरोपमध्ये परिस्थिती स्थिर किंवा घसरत असल्याचे दिसून आले आहे.
संख्या कमी असली तरी आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसंच पश्चिम युरोपमध्ये चिंता वाढवणारा ट्रेंड आहे.
कोरोना अनेक देश सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. आणि ज्यांना आधीच फटका बसला आहे तिथे संख्या वाढत चालली आहे अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. जगातील विविध देशांनी कोणतीही चूक करु नका. आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. हा व्हायरस आपल्यासोबत बराच वेळ असणार आहे, असा इशारा टेड्रोस यांनी यावेळी दिला.