नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता नरेंद्र मोदी बोलणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी ट्विट केले आहे. मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत यासंबंधी माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट करण्यात आले आहे.
Prime Minister @narendramodi will address the nation at 4 PM tomorrow.
— PMO India (@PMOIndia) June 29, 2020
लॉकडाउनचा पाचवा टप्पा आज संपत असून 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे. रविवारी ‘मन की बात’मध्ये बोलताना त्यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली असल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे पाच लाखांच्या घऱात आहे. दुसरीकडे पूर्व लडाखवरुन भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या लष्कर अधिकार्यांमध्ये सैन्य मागे घेण्यावरुन बैठक होणार आहे. भारतीय जमिनीवर घुसखोरी करणार्यांना भारतीय जवानांनी धडा शिकवला सांगताना नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव घेणे टाळले होते.