नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची प्रकरणे देशात सतत वाढत असून मंगळवारी सकाळपर्यंत माहितीनुसार देशात आतापर्यंत १२६ प्रकरणे समोर आली आहेत. सोमवारी कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमधून काही नवीन प्रकरणे समोर आली असून त्यांच्यामुळे संक्रमितांची संख्या वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सतत लोकांना माहिती आणि गर्दीच्या जागेपासून बचाव करण्याचा सल्ला देत आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना व्हायरसबाबत काही नवीन अपडेट सादर केले आहेत, ज्यात हेल्पलाईन नंबर, ईमेल आयडी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवीन हेल्पलाईन नंबर सादर केला आहे. १०७५ वर २४ तास कॉलिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे.
टोल नंबरशिवाय एक ईमेल आयडी सादर केला आहे, ज्यावर माहिती दिली जाऊ शकते. ncov2019@gmail.com नवीन ट्रॅव्हल एडव्हायजरीनुसार युएई, कतार, ओमान, कुवेत येथून येणाऱ्या कोणत्याही यात्रीवर १४ दिवस लक्ष ठेवले जाईल. हा आदेश १८ मार्चपासून आहे. युरोपियन युनियन, युरोपियन फ्री ट्रेंड असोसिएशन, तुर्की, युनायटेड किंगडमच्या नागरिकांना भारतात प्रवेशासाठी बंदी घातली आहे. १८ मार्चपासून लागू होणार हा आदेश पुढच्या अधिसूचनेपर्यंत जारी राहणार आहे.
पीएम मोदींनी मागितल्या सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सोशल मीडियावर लोकांकडून सूचना मागवल्या. पीएम मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना विषाणूचा कसा सामना करता येईल हे लोकांनी सुचवावे. लोक mygov.in वर जाऊन त्यांचे म्हणणे मांडू शकतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लोकांना आवाहन केले होते की, असे कोणतेही काम करू नका जेणेकरून दुसर्याला त्रास सहन करावा लागेल.