बहुजननामा ऑनलाइन टीम – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दहा लाखांच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 22 हजार 084 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुगणांची संख्या 10 लाख 37 हजार 765 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण 20.09 टक्के इतके आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 13 हजार 489 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 7 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.02 टक्के आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 2.81 टक्के आहे.
सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 768 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यामध्ये सध्या 16 लाख 52 हजार 955 होम क्वारंटाईन आहेत. तर 38 हजार 275 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत राज्यात 51 लाख 64 हजार 840 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 लाख 37 हजार 765 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरीत रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
Maharashtra reports 22,084 new #COVID19 cases, 13,489 discharges and 391 deaths today. The total number of cases in the state rises to 10,37,765 including 7,28,512 recoveries and 2,79,768 active cases: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/oysi6JKqMw
— ANI (@ANI) September 12, 2020