पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 1 हजार 740 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 15 जणांचा आणि शहराबाहेरील दोघांचा अशा एकुण 17 जणांचा दिवसभरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
सध्या पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 11 हजार 590 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 2 लाख 18 हजार 203 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणज ेआतापर्यंत तब्बल 2 लाख 1 हजार 661 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सक्रिय असलेल्या कोरोनाच्या 11 हजार 590 रूग्णांपैकी 355 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षिता विभागात उपचार केले जात आहेत. दिवसभरात 858 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात तब्बल 9 हजार 122 जणांचे स्वॅब घेऊन त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 740 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.