पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दोन आठवडयांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, पुण्यातील नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाटयाने वाढण्यास सुरूवात झाल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात तब्बल 1 हजार 86 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 6 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 796 रूग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 321 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 2 लाख 10 हजार 169 वर जाऊन पोहचली आहे.
त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 98 हजार 246 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 7 हजार 20 एवढी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 903 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे.