मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास आढळून येत होती. मात्र आज राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांच्यावर गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 2172 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे. राज्यात आज एकही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही दीड हजाराच्या पुढेच येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1098 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 65 लाख 04 हजार 831 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.65 टक्के झाले आहे. राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.
#COVID19 | Maharashtra reports 2,172 new cases, 1,098 recoveries, and 22 deaths today. Active cases 11,492
No new #Omicron case was reported in the state; till date, a total of 167 Omicron cases have been reported in Maharashtra pic.twitter.com/p5Alq0inxD
— ANI (@ANI) December 28, 2021
राज्यात आजपर्यंत 6 कोटी 86 लाख 45 हजार 512 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 61 हजार 486 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.7 टक्के आहे. सध्या 11 हजार 492 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 11 हजार 232 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title : Coronavirus in Maharashtra | Worrying! Large increase in corona patients in the state, 2172 new patients in last 24 hours; Learn other statistics
Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी