मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Covid-19) संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळून येत आहे. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) आज (शनिवारी) दिवसभरात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन विषाणूने (Omicran Covid Virus) धास्ती वाढवली आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामधील मुंबईत (Mumbai) 6 हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Coronavirus in Maharashtra)
#COVID19 | Maharashtra reports 9,170 new cases, 1,445 recoveries, and 7 deaths today. Active cases 32,225
Total 6 new #Omicron cases were reported in the state today; till date, a total of 460 Omicron cases have been reported in Maharashtra pic.twitter.com/VJCbeoc1hF
— ANI (@ANI) January 1, 2022
दरम्यान, मुंबई वगळता राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) आकडा तीन हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची (BMC) अधिक चिंता वाढली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.
नुकतंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली.
‘कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून आल्यास राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहे.’ दरम्यान दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वांनीच घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आज दिवसभरात 1445 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा आता 32225 वर जावुन पोहचला आहे. गेल्या 24 तासात 6 ओमायक्रॉन रूग्णांची वाढ झाली आहे. आता ओमायक्रॉनच्या एकूण रूग्णांची संख्या 460 वर पोहचली आहे.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | number of corona patients in the maharashtra is near to 10 thousand 9 thousand 170 new patients in last 24 hours
Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता
KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल