मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 5 हजार 508 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Coronavirus in Maharashtra) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 4 हजार 895 इतके रुग्ण बरे (patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 151 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजच्या 151 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 61 लाख 44 हजार 388 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 71 हजार 510 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 95 लाख 68 हजार 519 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 53 हजार 328 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 220 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 304 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 7 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.
– 202 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 488902.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2206.
– एकूण मृत्यू – 8813.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 477883.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 7640.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 215 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 233 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 265989.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 833.
– एकूण मृत्यू – 4359.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 260797.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5231.
Web Title :- coronavirus in maharashtra | Maharashtra reports 5,508 new COVID19 cases 4895 recoveries and 151 deaths in the last 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Accident News | दुर्दैवी ! दोन दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या