मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आज कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. राज्यात आज 1410 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. मागील दोन -तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच ओमायक्रॉन (Omycron Variant) बाधित रुग्ण देखील आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध (New Restrictions) लागू केले आहेत.
राज्यात आजपर्यंत 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.69 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.
Maharashtra reports 1,410 new cases, 12 deaths and 868 discharges today; Active caseload stands at 8,426
20 new cases of Omicron reported in the state today, takes case tally to 108. Out of these, 54 cases have been discharged following a negative RT PCR test pic.twitter.com/LC9QJrPh4p
— ANI (@ANI) December 24, 2021
आजपर्यंत 6 कोटी 82 लाख 35 हजार 476 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 54 हजार 755 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.75 टक्के आहे. सध्या 8 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 86 हजार 815 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण
राज्यात आज 20 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुंबई -11, पुणे-6, सातारा- 2 आणि अहमदनगर -1 येथील रुग्ण आहेत राज्यात सर्वाधिक मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत 46 रुग्ण आढळले आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Large increase in corona patients in the state, 1410 new patients diagnosed in last 24 hours, know other statistics
Omicron Covid Variant | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कठोर निर्बंध लागणार?