मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृतांची संख्या वाढत आहे. काल राज्यात 39 रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज हाच आकडा 94 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज 30 हजार 093 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.63 टक्के झाले आहे. राज्यात आज 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 42 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.84 टक्के झाला आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1488512905582899201?s=20&t=11wNlqkIxehWNUBLVyqEvw
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 77 लाख 35 हजार 481 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 01 लाख 91 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Diagnosis of 14,372 new corona patients in the last 24 hours in the state; Learn other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये
Baldness | टक्कल पडण्याची समस्या का होते? जाणून घ्या याची कारणे आणि बचावाच्या पद्धती