मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. आज राज्यात 902 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) भर पडली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान राज्यात 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 854 नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये आज किंचीत वाढ झाली आहे.
राज्यात आजपर्यंत 64 लाख 97 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्के इतके झाले आहे. तसेच आज दिवसभरात 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 349 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या राज्यात 7 हजार 068 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 76 लाख 84 हजार 674 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 49 लाख 596 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 72 हजार 982 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 898 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1472572901911977984?s=20
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 902 new patients in state in last 24 hours, find out other statistics
Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण
Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल
Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे (व्हिडिओ)