Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्यात नव्याने आढळणारी रुग्ण संख्या 2 हजारांहून कमी, गेल्या 24 तासात 11,408 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. आजतर नवीन आढळून आलेल्या रुग्णांची संख्या थेट दोन हजारांच्या खाली आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 966 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 11 हजार 408 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 61 हजार 077 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.66 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 416 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1493232795627700226?s=20&t=FJ6y6aI20EiP0FP3gT2v4w
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 65 लाख 27 हजार 895 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 44 हजार 915 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 36 हजार 447 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 03 लाख 48 हजार 408 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 815 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन (Omycron) रुग्णांची भर पडली आहे. हे रुग्ण मुंबईतील आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable! The number of newly diagnosed patients in the state is less than 2 thousand, 11,408 patients are ‘corona free’ in last 24 hours, find out other statistics
Comments are closed.