मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या दरम्यान आली आहे. आजही राज्यात 997 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 016 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 64 लाख 948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.64 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 475 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/PIBMumbai/status/1458797959206748166?s=20
सध्या राज्यात 12 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात (Coronavirus in Maharashtra) आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 36 लाख 30 हजार 632 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 21 हजार 420 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 10 हजार 264 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 876 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours in the state 1,016 ‘corona’ free, find out other statistics.
Pune Crime | कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून ‘मोक्का’ कारवाई
Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या भावात कमालीची वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर