मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून 5 हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 4 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5, 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.99 टक्के आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज दिवसभरात 145 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 21 लाख 24 हजार 250 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 20 हजार 510 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 20 हजार 905 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1429097248235819019?s=20
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 221 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 254 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.
– 209 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 491665.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2108.
– एकूण मृत्यू – 8879.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 480678.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 8733.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 168 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 147 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 268098.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1322.
– एकूण मृत्यू – 4386.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 262741.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4816.
पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.57 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 3 हजार 14 रुग्णांपैकी 10 लाख 76 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 8 हजार 377 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.57 टक्के आहे.
Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 5,914 corona free in the last 24 hours in the state find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्यांना 2022 पर्यंत मिळेल PF