मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 631 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत राज्यात 64 लाख 90 हजार 936 रुग्णांनी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्के आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1469330030371098624?s=20
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे. सध्या राज्यात 6 हजार 534 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 66 लाख 39 हजार 988 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 42 हजार 372 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. सध्या राज्यात 75 हजार 290 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत. तर 870 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 695 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics
Omicron Covid Variant in Pune | नायजेरियातून पिंपरीत आलेल्या आणखी 4 जणांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा
Mumbai NCB | NCB ने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू ; प्रचंड खळबळ
Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ