मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (बुधवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र आज वाढली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 5 हजार 560 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 6 हजार 944 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आतापर्यंत 61 लाख 66 हजार 620 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.82 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 163 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 34 हजार 364 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 64 हजार 570 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 01 लाख 16 हजार 137 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 69 हजार 002 (12.71 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 01 हजार 366 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,676 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 6,944 corona free in the last 24 hours in the state find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BHR Scam | बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात सुनील झंवरला 10 दिवसांची दिवस कोठडी