मुंबई : ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज (सोमवार) 569 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 498 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत राज्यात 64 लाख 93 हजार 002 रुग्णांनी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.7 टक्के आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1470416781772660737?s=20
राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे. सध्या राज्यात 6 हजार 507 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 69 लाख 58 हजार 681 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 44 हजार 452 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. सध्या राज्यात 74 हजार 190 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत. तर 887 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 569 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics
PMFBY | शेतकर्यांनी रब्बी पिकाचा 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावा विमा, अन्यथा मिळणार नाही लाभ
Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण