मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 5 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (मंगळवार) घट झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आज 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5, 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.87 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 116 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 35 हजार 255 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 12 लाख 91 हजार 383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 01 हजार 213 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 3 लाख 53 हजार 807 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,233 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 5424 corona free in the last 24 hours in the state find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार ?