मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात आज (सोमवार) 04 हजार 145 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 05 हजार 811 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 95 हजार 744 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.86 टक्के झाला आहे. आज 100 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.11 टक्के आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात सध्यात 62 हजार 452 सक्रीय रुग्ण (c) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 11 लाख 11 हजार 895 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 96 हजार 805 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 03 लाख 53 हजार 129 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 530 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1427263812353216512?s=20
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 128 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 185 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 15 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.
– 203 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 490574.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2035.
– एकूण मृत्यू – 8853.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 473866.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6272.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 85 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 89 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 1 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267253.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 946.
– एकूण मृत्यू – 4378.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 261929.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4402.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 4,145 new patients of Corona in the last 24 hours in the state know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pankaja Munde | पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या; म्हणाल्या – ‘कसल्या फालतू घोषणा देत आहात?’
Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव