मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 4 हजार 130 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Coronavirus in Maharashtra) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 2 हजार 506 इतके रुग्ण बरे (patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 64 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजच्या 64 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 37 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 88 हजार 851 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 52 हजार 025 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 46 लाख 60 हजार 825 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 82 हजार 117 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Maharashtra reports 4,130 new #COVID19 infections, 2,506 recoveries and 64 deaths today.
Active cases: 52,025
Total recoveries: 62,88,851
Death toll: 1,37,707 pic.twitter.com/ut0dHlyMJV— ANI (@ANI) September 4, 2021
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 199 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 391 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 207 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 496543.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2311.
– एकूण मृत्यू – 8945.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 485287.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 10094.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 193 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 135 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 270303.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1484.
– एकूण मृत्यू – 4402.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 264680.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 6631.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 4,130 new corona patients 2,506 discharged in the last 24 hours in the state
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Junner News | खोट्या शिवभक्त ‘अक्षय बोऱ्हाडे’वर पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप