मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 748 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 111 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज 05 हजार 806 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 75 हजार 578 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.77 टक्के झाले आहे. राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1493952518673793026?s=20&t=XbBK4ppOf_izFvoyBzHckw
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 50 हजार 494 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 27 हजार 445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 2748 new patients of Corona in the last 24 hours in the state find out other statistics
Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 6.25 कोटींची फसवणूक, महिलेसह दोघांवर FIR; एकाला अटक