नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला, अजूनही जगातील शास्त्रज्ञ अजूनही कोरोनाची नवीन लक्षणे आणि त्याच्या संबंधीत समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यू जर्सीच्या रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आपल्या संशोधनात पहिले असे प्रकरण मिळाले आहे ज्यामध्ये कोरोनामुळे रूग्णाच्या हातांमध्ये भयंकर ब्लड क्लॉटिंग झाले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, या संशोधनातून जाणून घेण्यास मदत मिळेल की, कोरानामुळे होणारे इम्फ्लेमेशन शरीराचे कशाप्रकारे नुकसान करते. सोबतच वारंवार होणार्या ब्लड क्लॉटिंगचा उपचार कशा प्रकारे केला जाऊ शकतो.
यापूर्वी कोविडच्या रूग्णांमध्ये शरीराच्या खालच्या भागात ब्लड क्लॉटिंगची समस्या दिसून आली होती परंतु हे पहिले असे प्रकरण आहे ज्यामध्ये कोरोनामुळे रूग्णांच्या हातांमध्ये ब्लड क्लॉटिंग झाले आहे.
व्हायरसेस जनरलमध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, शरीराच्या वरच्या भागात झालेले हे ब्लड क्लॉटिंग 85 वर्षाच्या एका रूग्णात आढळले. संशोधक पायल पारिख यांच्यानुसार, रूग्ण आपल्या डॉक्टरांकडे दोन्ही दंडामध्ये सूज असल्याची समस्या घेऊन आला होता. ज्यानंतर त्यास तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तपासणीत रूग्णाच्या हाताच्या वरच्या भागात ब्लड क्लॉट आढळला. रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता परंतु त्याच्यात कोणतेही लक्षण नव्हते.
संशोधनात डॉक्टर पारिख यांनी सांगितले की, रूग्णाची ऑक्सीजन लेव्हल कमी झाली नव्हती परंतु हातात झालेल्या ब्लड क्लॉटिंगमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ब्लड क्लॉटिंग शरीरात इम्फ्लेमेशनमुळे किंवा त्या लोकांमध्ये होते जे जास्त हालचाल करू शकत नाहीत. आरोग्य आणि अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये ही प्रकरणे कमी दिसतात.
स्टडीनुसार, बहुतांश ब्लड क्लॉटिंग पायात आढळते. हातांमध्ये ब्लड क्लॉटची केवळ दहा टक्के प्रकरणेच समोर येतात. यापैकी 9 टक्के प्रकरणात ब्लड क्लॉटिंग वारंवार तयार होतो.
डॉक्टर पारिख म्हणाल्या, हा एक चिंतेचा विषय आहे कारण 30 टक्के रूग्णांमध्ये ब्लड क्लॉट फुफ्फुसांपर्यंत पोहचतो, जो धोकादायक ठरू शकतो. या कारणामुळे सूज, वेदना आणि थकवा सुद्धा कायम राहू शकतो.