सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर वाढत चालला असून आता कारागृहातील कैद्यानाही तीवृतेने बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. सोलापुरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याच्या अखेरीस सोलापूर जिल्हा कारागृहातील तब्बल 34 कैद्यांना कोरोना झाला आहे. एवढ्या मोठया संख्येन कैद्यांना कोरोना खळबळ उडाली. याच कारागृहातील एका कर्मचार्यालाही कोरोना बाधा झाल्याचे उघडकीस आले होते.
जिल्हा कारागृहात तीन दिवसांपूर्वी एका कैद्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर याच कारागृहातील एका कर्मचा-यालाही बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील कैद्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असता त्यापैकी 34 कैदी कोरोनाबाधित निघाले. सोलापुरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 851 झाली आहे. शुक्रवारी सापडेल्या 103 रुग्णांमध्ये बार्शी तालुक्यातील जामागाव येथील तीन महिला व कुंभारीच्या विडी घरकुलातील एक महिला अशा चार ग्रामीण महिला कोरोनाग्रस्त झाल्या आहेत. दरम्यान, अद्याप 499 चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.