बिजिंग : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना वायरसमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या रविवारी 56 वर पोहोचली होती. या सोबतच 1975 लोक पीडित असल्याचे वृत्त आहे. यापैकी 324 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनी आरोग्य प्रशासनाने ही माहिती दिली.
चीनमध्ये पसरलेल्या या आजाराला निमोनियाचा नवा प्रकार म्हटले जात आहे. ज्यास 2019-एनसीओव्ही नाव देण्यात आले आहे. या वायरसने चीमध्ये आतापर्यंत 56 लोकांचा जीव घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे. आयोगाने सांगितले की, आतापर्यंत 2684 लोकांना याची लागण झाली आहे.
या आजाराचे केंद्र वुहान आणि हुबेई राज्यातील 17 अन्य शहरे आहेत. येथे या वायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत. परंतु, आता बिजिंगसह चीनच्या अन्य राज्यांच्या शहरांतही हा आजार वेगाने पसरत आहे.
हुबेई राज्यात 25 जानेवारीपर्यंत या वायरसचा संसर्ग झालेले आणखी 323 लोक आढळले आहेत. येथे13 आणखी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यात 25 जानेवारीपर्यंत एकुण 1052 केसेस आढळल्या आहेत. ज्यापैकी 129 रूग्णांची स्थिती गंभीर आहे. येथे 52 लोकांच मृत्यू झाला आहे. सरकारी ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
बिजिंगमध्ये शनिवारपर्यंत कोरोनावायरसची लागण झालेले दहा नवे रूग्ण सापडले आहेत. यामुळे आता शहरात या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या 51 झाली आहे. स्थिती गंभीर झाल्यानंतर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शनिवार म्हटले की, चीन एका गंभीर स्थितीचा सामना करत आहे, पण कोरोना वायरसविरूद्धची ही लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सार्ससारखा हा आजार पसरण्यास प्रतिबंध घालण्यासाठी चीन वेगाने पावले उचलत आहे. चीनने रविवारी घोषणा केली की वुहानमध्ये येत्या 15 दिवसात 1300 बेडचे आणखी एक रूग्णालय तयार करण्यात येईल. शहरात सध्या एक हजार बेडचे एक रूग्णालय यापूर्वीच तयार केले जात आहे, ज्याचे काम येत्या दहा दिवसात पूर्ण होईल. चीन ज्या पद्धतीने युद्धपातळीवर रूग्णालयांची निर्मिती करत आहे, त्यावरून या आजाराची तीव्रता आणि गांभिर्य लक्षात येते. चीन जास्तीत जास्त रूग्णांवर उपचार करण्याची आपली क्षमता वाढवत आहे. हा वायरस हाँगकाँग, मकाऊ, नेपाळ, जपान, सिंगापुर, दक्षिण कोरिया, थायलॅड, व्हिएतनाम आणि मागच्या गुरुवार अमेरिकापर्यंत पोहचला आहे. जपानने शुक्रवारी दुसरा रूग्ण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.