बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देंशामध्ये लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थिती कोरोना आटाेक्यात आणण्याचा जगभर प्रयत्न सुरु असताना इस्त्राईलच्या वैज्ञानिकांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेतील कोरेाना विषाणूचा संसर्ग हा ज्यांनी लस घेतली आहे त्यांना कोरोना झालेल्यांच्या तुलनेत आठ पट जास्त आहे. या दाव्यामुळे जगभरातील वातावरण ढवळून निघाले. परंतु, भारतातील संसर्ग तज्ञांपैकी एक असलेले डॉ. गगनदीप कांग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इस्त्राईल वैज्ञानिकांचा दावा खोडून काढला आहे. त्याच्या मते, हा स्ट्रेन इस्त्राईल वैज्ञानिकांनी सांगितलेल्यानुसार भयंकर नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या अहवाला लसीकरण झालेल्या व्यक्तींचा समावेश केला असून त्यांची तुलना लस न घेतलेल्या लोकांशी केली आहे.
कोरोना विषाणूच्या यूके व्हेरिएंट बी.१.१.७ मध्ये बहुतेक लोकांना संसर्ग झाला होता. या अभ्यासामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली ती म्हणजे ज्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता त्याचबरोबर दुसऱ्या डोससाठी एका आठवड्यापेक्षा कमी वेळ होता ते लोक या व्हेरिएंटच्या जाळ्यात अडकले. परंतु, व्हेरिएंट बी १.३५१ ने दक्षिण आफ्रिकेतील आठ लोकांना संसर्ग झाला. यामध्ये ज्याने लस घेतली नाही ती व्यक्ती संक्रमित आढळली. म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना प्रकाराचा संसर्ग लस घेतलेले आणि लस न घेतलेले यांचे प्रमाण ८:१ अशं आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा प्रकार बी १.३५१ चा लस घेलेल्यांवर परिणाम कारक नसल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. परंतु १४ दिवसांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या कोणालाही संसर्ग आढळला नाही हे सत्य आहे. म्हणजेच दक्षिण आफ्रिकी कोरोनाचा संसर्ग हा लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी किंवा दुसरा डाेस घेतल्यानंतर एका आठवड्याच्या आत लोकांना होऊ शकतो. यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्या लोकांवर संक्रमणाचा कोणताही धोका नाही.
फायझर लसीवर इस्त्राईल वैज्ञानिकांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे दुसऱ्या लसीबाबतही हाच निष्कर्ष लावणे योग्य ठरेल की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे या दाव्यांनी पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता असल्याने डॉ. कांग यांनी म्हंटले आहे. भारतात फायझर लस वापरली जात नसल्यामुळे किंवा दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना प्रकारचे रुग्ण आढळत नसल्याने इस्त्रायली अभ्यासाबद्दल चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. सध्या दोन मूलभूत प्रश्न आहे ते म्हणजे, कोरोना विषाणूंचे भिन्न प्रकार आणि त्यांच्यावरील वेगळवेळ्या लसींचा प्रभाव. इस्त्राइलने केवळ फायझर लसीचा अभ्यास केला परंतु, इतर लसींच्या प्रभावांचा अभ्यास केल्यास आपण कोणत्या लसीसाठी अधिक कार्यक्षम आहे याची कल्पना येऊ शकते. जगात कोरोनाने कहर केला आहे. जगातील बाधितांची संख्या १३ कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे तब्बल १,८४,३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०२७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.