नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus |कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत दररोज नवनवीन रिसर्च समोर येत आहेत. या दरम्यान आता एक नवीन स्टडीत दावा करण्यात आला आहे की, घराच्या आत कोरोनापासून वाचण्यासाठी 6 फुटांचे अंतर सुद्धा पुरेसे नाही आणि 6 फुटाच्या अंतरात सुद्धा एक संक्रमित व्यक्ती दुसर्या व्यक्तीला संक्रमित (Coronavirus) करू शकते.
सस्टेनेबर सिटीज अँड सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधन सांगते की, केवळ शारीरीक अंतरच संसर्ग रोखण्यासाठी पुरेसे नाही. तर मास्किंग आणि व्हेंटिलेशनसारख्या गोष्टी सुद्धा यासाठी आवश्यक आहेत.
या संशोधनात तीन कारकांची चाचणी समोर आली आहे. यामध्ये स्पेसच्या माध्यमातून हवेच्या व्हेंटिलेशनची मात्रा आणि दर, यावर संशोधनात संशोधकांनी तीन कारकांची चाचणी केली. यापैकी स्पेसच्या माध्यमातून हवेची व्हेंटिलेशनची मात्रा आणि दर, विविध व्हेंटिलेशन रणनितीसंबंधी इनडोअर एयरफ्लो पॅटर्न, श्वास घेताना किंवा बोलतानाचे एरोसोल एमिसन मोड यांचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विनामास्क 6 फुट अंतरावर सुद्धा संक्रमित होऊ शकते व्यक्ती
या संशोधनातून समजले की, जर एखादी संक्रमित व्यक्ती 6 फुटाच्या अंतरावर बसून विना मास्क एखाद्या दुसर्या व्यक्तीशी बोलत असेल
तर त्याचे व्हायरस दुसर्या व्यक्तीला संक्रमित करू शकतात.
हा प्रकार खोलीच्या आत जास्त दिसू शकतो, जिथे व्हेंटिलेशन कमी आहे.
संशोधकांना आढळले की, एयरोसोल्स डिस्प्लेसमेंट व्हेंटिलेशनच्या खोलीत आणखी जास्त वेगाने प्रवास करतात, जिथे ताजी हवा सातत्याने जमीनीवरून वाहत असते आणि जुन्या हवेला छपराच्या जवळ एक बाहेर पडणार्या वेंटमध्ये ढकलते.
अशा प्रकारचे व्हेंटिलेशन बहुतांश घरात असते.
Web Titel :- Coronavirus | corona can spread even after keeping a distance of 6 feet inside the house claims in the study.
Supreme Court | भांडणानंतर आत्महत्या ! 306 आयपीसी गुन्हा नाही – सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण