नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये सुरू झालेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसने भारतासह दोन डझन देशांना घेरले आहे. एकट्या चीनमध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक लोकांचे प्राण गमावले असून सुमारे २१ हजार लोक असुरक्षित आहेत. भारतासह इतर देशातही या व्हायरसमुळे गोंधळ उडाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व देशांनी चीनकडे येण्याचे आणि जाण्याचे सर्व मार्ग अवरोधित केले आहेत. परंतु, ही महामारी अचानक संपूर्ण जगात पसरलेली नाही. वास्तविक एका चिनी डॉक्टरांनी आपल्या सरकारला कोरोना व्हायरसबद्दल इशारा दिला. परंतु त्याचा आवाज जगापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याला दडपण्यात आले. त्याचे नाव ली वेनलिंग आहे.
३० डिसेंबर रोजी आजाराबद्दल चेतावणी दिली होती
मागच्या वर्षी ३० डिसेंबर रोजी ली वेनलिंग यांनी याबाबत चेतावणी दिली होती. ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकवत होते, त्या कॉलेजच्या ऑनलाइन अॅल्युमनी चॅट ग्रुप वुईचॅट वर सांगितले होते की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये स्थानिक मच्छी मार्केटमूधन सात रूग्ण आले आहेत, ज्यांना सार्ससारख्या आजाराची लक्षणे होती आणि त्यांना रुग्णालयातील आइसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले गेले होते.
२००३ मध्येही सरकारने हा आजार लपवला होता
ली यांनी सांगितले की, तपासणी केल्यावर असे आढळले की हा रोग कोरोनाव्हायरस आहे, हा व्हायरसचा मोठा परिवार आहे. २००३ मध्येही या विषाणूमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि चीनमध्ये या विषाणूची मुळे खूप जुनी आहेत. डॉक्टर ली म्हणाले, “मला माझ्या विद्यापीठातील सहकाऱ्यांना याबद्दल चेतावणी देण्याची इच्छा होती.”
व्हायरल स्क्रीनशॉट बनला संकटाचे कारण
३४ वर्षांचे ली हे कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित चीनच्या वुहानमध्ये प्रॅक्टिस करतात. ली ने आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना गोपनीय मार्गाने याबद्दल सांगण्यास सांगितले. पण त्याचा स्क्रीनशॉट काही वेळात व्हायरल झाला. यानंतर ली यांना समजले की त्यांच्यावर आता संकट येऊ शकते. वुहानच्या आरोग्य प्रशासनाने लीला नोटीस पाठविली की आपणास याबद्दल कसे कळले ते विचारले. काही वेळातच पोलिसांनी त्यांच्यावर अफवा पसरवण्याचा आरोप केला. परंतु, असेही नव्हते की आवाज उठवणारे ते एकटेच होते. पोलीसांनी सर्व वैद्यकीय अधिकार्यांना निशाण्यावर घेतले. सरकारकडून नोटीस आली की कुणीही आजार आणि त्याच्या आजाराबाबतची माहिती लीक करणार नाही. डॉक्टर ली यांच्याकडून असे पुन्हा करणार नाही, असे लेखी लिहून घेतल्यानंतर सोडण्यात आले.
आता डॉक्टर स्वतः कोरोनाव्हायरसचा बळी
यानंतर चीनमधील सुमारे २१ हजार लोक या प्राणघातक विषाणूचा बळी ठरले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे डॉक्टर ली यांचे नावही या लोकांच्या यादीत समाविष्ट आहे. याची बातमी त्याने स्वत: एका वृत्तसंस्थेला दिली. १० जानेवारी रोजी वुहान रूग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असतांना त्यांना खोकला आणि ताप आला. १२ जानेवारीपासून तो हॉस्पिटलमध्ये असून सध्या ते आयसीयूमध्ये आहे. १ फेब्रुवारीला त्यांना कोरोनाव्हायरसचा त्रास असल्याची पुष्टी झाली.