नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये ८०,४०९ लोकं संक्रमित झाले असून आतापर्यंत ३०१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसची भीती इतकी पसरली आहे की, न्हावी लोकं केस कापण्यासाठी चार फूट लांब उभे राहत आहेत. ते चीनच्या सोशल मीडियावर याबाबत एक विडिओ व्हायरल होत आहे. ते ज्या प्रकारे केस कपात आहेत हे पाहून आश्चर्य वाटेल.
Chinese hairdresser.
In an epidemic, wash your hands and head more often.#Coronavirus #COVID19 #COVID2019 #CoronaOutbreak #ChinaCoronaVirus #كورونا #China #CoronaOutbreak pic.twitter.com/PVBzlt8E1S
— Farhang F. Namdar (@FarhangNamdar) March 1, 2020
जर तुमचा न्हावी तुम्हाला म्हणाला कि मी तीन-चार फूट लांबून तुमचे केस कापेल, तर तुम्हाला कसं वाटेल? पण असे चीनमध्ये घडले आहे. हेनान प्रांतात अनके हेअर ड्रेसर्सने विचित्र पद्धतीने तीन-चार फुटावरून लोकांचे केस कापले आहेत. लोकांची केशभूषाही तीन-चार फुटावरून होत आहे. त्यांनी एका वेगळीच पद्धत निवडली असून ते मोठ्या-मोठ्या दांडक्यामध्ये कात्री, ट्रीमर, ब्रश इत्यादी लावले आहे. त्यानेच केशभूषा करत आहेत.
फक्त हेनान प्रातांतच नाही तर चीनच्या सिचुआन प्रांतात लुझोऊमध्येही न्हावी याच प्रकारे वापर करत आहेत. यामुळे चीनचे लोकं लॉंग डिस्टन्सने हेअर कटिंग करत आहेत. लुझोऊच्या हेअर स्टाईल बिंगने म्हटले की, क्वारंटीन जवळजवळ संपले असून लोकं आता बाहेर पडत आहेत. पण बचावासाठी गरजेचे आहे की, आता आम्ही लांबूनच हेअर कटिंग करणार आहोत.
या कामात कष्ट करणे खूप जास्त असून बारिकपणाची काळजीही घेतली पाहिजे. आपल्या हातात बरीच शक्ती आले तरच आपण अशा अंतरावरुन मशीन धरून ठेवू शकतो आणि हेअर कटिंग करू शकतो. चीन सरकारने आदेश जारी केला असून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी एक दुसऱ्यापासून ५ फूट अंतर ठेवावे. जेणेकरून कोरोना व्हायरस पसरायची भीती कमी होईल.