बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 58 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 172 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर, इंदिरानगर आणि साईबाबनगर करोनामुक्त झाली आहेत. या भागात मागील एक महिन्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 58 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 195 वर पोहचली आहे. आज 172 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 92 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
गेल्या 24 तासामध्ये शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण पिंपरी येथील आहे. आतापर्यंत शहरात 2471 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1751 शहरातील तर 720 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 744 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 90 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 80 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.