बहुजननामा ऑनलाइन – पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 911 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 63 हजार 209 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 309 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.63 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 13 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 613 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.75 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 490 रुग्णांपैकी 10 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 704 रुग्णांपैकी 15 हजार 164 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 718 आहे. कोरोनाबाधित एकूण 822 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 25 रुग्णांपैकी 9 हजार 65 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 679 रुग्णांपैकी 18 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 615 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 447, सातारा जिल्ह्यात 827 , सोलापूर जिल्ह्यात 534 , सांगली जिल्ह्यात 763 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 95 हजार 493 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 77 हजार 911 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )